शिवाजीनगर न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका सत्रात

सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत होणार सुनावणी

पुणे – शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे कामकाज पुन्हा एकाच सत्रात होणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत कामकाज चालणार आहे. पुणे बार असोसिएशनने केलेल्या विनंतीनुसार मुंबई उच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय घेतला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयाचे कामकाज दोन सत्रात चालविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार येथील न्यायालयाचे कामकाज सोमवारी (दि.21) दोन सत्रात झाले. मात्र, येथील करोनाची परिस्थिती पाहता पुणे बार असोसिएशनने येथील कामकाज एकाच सत्रात ठेवण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे केली.

उच्च न्यायालयाने याची तातडीने दखल घेत एकाच सत्रात कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक यांनी दिली. जामीन, रिमांड आणि अंतिम सुनावणी असलेल्या केवळ महत्त्वाच्या प्रकरणांची न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायाधीश शंभर टक्‍के उपस्थित राहणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.