शिवाजीनगर मतदारसंघात बदल घडवणार : बहिरट

दुचाकी फेरी काढून फोडला प्रचाराचा नारळ

शिवाजीनगर – “माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात आपण नेमहीच जनतेच्या हिताला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मतदारसंघातील नागरिक विधानसभेसाठी मला नक्‍की संधी देतील,’ असा विश्‍वास व्यक्त करत आघाडीचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी रविवार प्रचाराचा नारळ फोडला.

यावेळी बहिरट यांनी गोखलेनगर भागात दुचाकी फेरी काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, कॉंग्रेसचे माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती अध्यक्ष नीलेश निकम, बाळासाहेब बोडके, उदय महाले, श्रीकांत पाटील, सतीश धोत्रे, राजू साने, प्रदीप देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष साक्षी गायकवाड, सरचिटणीस सुजीत हांडे, शहर कॉंग्रेसच्या महिला अध्यक्ष सोनाली मारणे यांच्यासह भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) व मित्र पक्ष आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बहिरट म्हणाले, “पक्षाचा कार्यकर्ता आणि नगरसेवक म्हणून या मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील मतदार बदल घडविण्यास सज्ज झाले आहेत. महाआघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांचा माझ्या कार्यावर विश्‍वास आहे. त्यामुळे शिवाजीनगरमध्ये नक्की बदल घडणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून कार्यकर्ते स्वतः प्रचाराच्या कामाला लागले असून मतदारांनीच निवडणूक हातात घेतली आहे.

बारामती हॉस्टेल येथून दुचाकी फेरीला सुरुवात झाली. त्यानंतर गोखलेनगर मुख्य रस्ता, वीर बाजीप्रभू शाळा, मॅफ्को, नीलज्योती सोसायटी, जनवाडी ऑफिस, कुसाळकर चौक, वेताळ चौक, भाभा हॉस्पिटल, मारुती मंदिर, गोलंदाज चौक, दीपबंगला चौक, गणेशखिंड रस्ता, ब्रेमेन चौक, परिहार चौक, औंध गाव, भाऊ पाटील रस्ता, बोपोडी, मानाजी बाग, खडकी, खडकी बाजार, येरवडा, मुळा रोड, वाकडेवाडी, संगमवाडी, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, फर्गसन रस्ता-ज्ञानेश्‍वर पादुका चौक, मॉडर्न कॉलेज, बालगंधर्व चौक, कॉंग्रेस भवनापासून रोकडोबा मंदिर येथे दाखल झाली. येथेच प्रचार फेरीचा समारोप झाला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here