पुणे – अंगारकी चतुर्थीनिमित्त शिवाजी रस्त्यावरील विविध गणपती मंदिरांत भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे
19 एप्रिल रोजी पीएमपी बसेस, चारचाकी वाहनांसाठी शिवाजी रस्ता बंद करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार दुचाकी वाहनांसाठी देखील लाल महाल चौकापासून पुढे जाण्यास निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी आदेश दिले. या दरम्यान नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
असा आहे पर्यायी मार्ग
*शिवाजी रस्त्याने स्वारगेटला जाणाऱ्या वाहनांनी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रोडने जावे.
*स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाणाऱ्या वाहनांनी बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने झाशी राणी चौकातून डावीकडे वळून जावे.
*लाल महाल चौकापर्यंत येणाऱ्या दुचाकी वाहनांनी डावीकडे किंवा उजवीकडे वळून जावे.
*आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी बाजीराव रस्त्याने जावे.