Bharat Jodo Nyay Yatra । Rahul Gandhi । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप होतोय. या यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात आज इंडिया आघाडीची आज भव्य सभा आयोजित करण्यात आलीय. । Bharat Jodo Nyay Yatra
या सभेला देशभरातील इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या सभेकडे लागले आहे. विशेष म्हणजे शिवाजी पार्कवरील सभेच्या माध्यमातून काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराची सुरुवात केली जाणार आहे.
यावेळी सभेला संभोधित करताना सर्वच राजकीय नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. राहुल गांधी यांनी शिवतिर्थावर इंडिया आघाडीसमोर भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
त्यावेळी 56 इंचची छाती नाही, केवळ पोकळ व्यक्ती आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी मोदी आणि भाजपवर निशाणा साधताना म्हटलं की, ‘नरेंद्र मोदी, भाई और बहनों हा फक्त एक चेहरा आहे. चित्रपटातील नायकाप्रमाणे त्यांना एक रोल दिला गेला आहे.
56 इंचाची छाती नसून पोकळ आहे. मला विचारण्यात आलं तुमची यात्रा कुठून कुठपर्यंत होईल. मी विचार केला, मात्र एक ठरलं होतं यात्रा मणिपूरमधून सुरुवात होईल. तिथे भाऊ भावाला गोळी मारत आहे. तिथूनच यात्रेची सुरुवात करण्याचा ठरवलं.
तसेच, यावेळी मी विचार केला भारताला नवीन व्हिजन द्यायचा असेल, यात्रेचे समारोप धारावीत झालं पाहिजे. धारावीत टॉयलेट आहे, आज या धारावीमधील लोकांना ती शक्ती त्यांच्या घरातून बाहेर काढून फेकत आहे.’ असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. Bharat Jodo Nyay Yatra । Rahul Gandhi ।
“इंडिया झुकेगा नही, इंडिया रुकेगा नही’ – मेहबुबा मुफ्ती
इंडिया झुकेगा नही, इंडिया रुकेगा नही, असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. 2014 च्या निवडणुकीत 15 लाख अकाऊंटमध्ये येणार सांगून भाजपने मते मागितली, पण असं काही केलं नाही. 2019 च्या निवडणुकीत पुलवामा शहीदांच्या नावाने मते मागितली आणि काहीही केलं नाही, असं म्हणून मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
“आता भाजपला चलो जाओ म्हण्याची वेळ आलीये…” – शरद पवार
“भारताच्या स्थितीत बदल घडवण्याची गरज आहे. देशाची ताकद ज्या लोकांच्या हातात आहे, त्यांनी शेतकऱ्यांचा, महिलांचा आणि सर्व घटकांचा हिरमोड केलाय. तुम्हाला त्यांच्याकरून आश्वन दिलं जातील, पण तुम्ही बळी पडू नका. तुम्हाला खूप आश्वसने दिली गेली आहेत. याच मुंबईतून महात्मा गांधींनी चलो जाओ म्हणत इंग्रजांना हकलून लावलं होतं. पण आता भाजपला चलो जाओ म्हण्याची वेळ आलीये”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
सभेला दिग्गज नेत्यांची हजेरी –
मुंबईतील शिवाजी पार्कवर होणाऱ्या आजच्या सभेला राहुल गांधी, प्रियांका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन,
झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, वर्षा गायकवाड, रेवांथ रेड्डी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत.