बॉलिवूडमध्ये साकारणार शिवाजी महाराजांची शौर्यगाथा; ‘हा’ अभिनेता छत्रपतींच्या भूमिकेत

मुंबई – मागील अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवनावर आधारित चित्रपट बॉलिवूडमध्ये तयार कऱण्यात येणार असल्याचे वृत्त येत होते. अभिनेता रितेश देशमुखने यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे वृत्त होते. अद्याप त्या संदर्भात काहीही माहिती समोर आली नाही. मात्र बॉलिवूडमध्ये एक निर्माता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट बनविण्यास प्रयत्नशील आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील अनेक सरदारांच्या जीवनावर आधारित चित्रपट आले आहे. यामध्ये ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’  चित्रपट हिट झाला होता. आता सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यावर चित्रपट येणार आहे. मात्र शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्यदिव्य चित्रपटांची प्रतीक्षा शिवप्रेमींना आहे. बॉलिवूडमधील अनेक निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनविण्यास इच्छूक आहेत. यामध्ये रोहित शेट्टी, अली अब्बास जफर, रितेश देशमुख यांचा समावेश आहे. मात्र आता यात भर पडली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)


‘कबीर सिंग’ चित्रपटाचे निर्माते अश्विन वर्दे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविण्यास इच्छूक आहेत. छत्रपतींची भूमिका साकारण्यासाठी त्यांनी अभिनेता शाहिद कपूरला विचारणा केल्याचे समजते. शाहिदला देखील  वर्दे यांची संकल्पना खूप आवडली असून त्याने शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी होकार कळविला आहे. या चित्रपटाची निर्मिती लायका प्रोडक्शनद्वारे करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.