‘तानाजी’मध्ये ‘हा’ मराठी अभिनेता दिसणार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

मुंबई – ‘स्वराज्य’ निर्मितीच्या पवित्र कार्यात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाच्या पानांवर या मावळ्यांचं कर्तृत्त्व सोनेरी अक्षरात कोरलं आहे. या मावळ्यांपैकी एक नाव म्हणजेच तानाजी मालुसरे.

तानाजींच्या पराक्रमाची कथा आता ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘तानाजी’ चित्रपटात बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अभिनेता अजय देवगण तानाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे.

दरम्यान, आज अजयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.

या पोस्टरमध्ये डोक्यावर जीरेटोप, टोकदार दाढी, गळ्यात मोत्यांची माळ अशा राजेशाही थाटातील शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील फर्स्ट लूक दिसत आहे.

तसेच या पोस्टरमध्ये घोड्यावर स्वार झालेले महाराज दाखवण्यात आले आहेत. शिवाजी महाराजांची भूमिका मराठमोळा अभिनेता शरद केळकर हा साकारत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.