वाघोली – बकोरी (ता. हवेली) ग्रामस्थांच्या वतीने बकोरीतील डोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात शिवजयंती उत्सव विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. बकोरीचे डोंरावर होत असलेले वृक्षारोपण, छत्रपतींचे स्मारक, भवानीमातेचे मंदिर, मातीच्या बंधाऱ्यामुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाने मदत करणे गरजेचे असल्याचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य शांताराम वारघडे यांनी सांगितले.
यावेळी आई भवानी माता व छत्रपती शिवाजी महाराज यांची पंचामृताने स्नान घालून विधिवत पूजा, आरती करण्यात आली, असे सुनील वारघडे यांनी सांगितले. यावेळी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, सर्जेराव कुटे, रामदास सोनबा वारघडे, सुनील कुटे, धनराज वारघडे, गणेश बहीरट, शिवव्याख्याते मुकुंद वेताळ, चंद्रकांत पवार, भैया दात्रे आदि शिंदे, ऋषिकेश बहीरट, अनिकेत बागाडे, शेकडो तरूण उपस्थित होते. वेताळ व चंद्रकांत वारघडे यांनी मनोगते व्यक्त केले. सुनील कुटे व सहकार्यांनी आकर्षक फुलांची सजावट केली होती. डोंगरावर चढताना त्रास होऊ नये यासाठी पायऱ्या केल्या होत्या. सर्व तरूणांचे ग्रामस्थांच्या वतीने शांताराम वारघडे यांनी आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.