मुंबई – छोट्या पडद्यावरील ‘खतरों के खिलाडी’ हा लोकप्रिय शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लवकरच या कार्यक्रमाचे 13 वे पर्व सुरू होणार आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीने बिग बॉस 16 च्या फिनालेमध्ये याबाबत खुलासा केला होता. बिग बॉस 16 चा उपविजेता शिव ठाकरे ‘खतरों के खिलाडी’ सीझन 13 चा पहिला स्पर्धक म्हणून फायनल झाला होता. त्यानंतर आता ‘खतरों के खिलाडी’ च्या शूटिंगला दक्षिण आफ्रिकेत शूटींगला सुरुवात झाली आहे. नुकतेच शिवने याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
शिव ठाकरे सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमादरम्यानचे काही व्हिडीओ त्याने या आधी इनस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्यानंतर आता त्याने रोहित शेट्टीसोबतचा एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. “जेव्हा रोहित शेट्टी असे करतात, तेव्हा ट्रेंड अजूनच ट्रेंड व्हायला लागतो”, असे कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिले आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओत या कार्यक्रमाचे स्पर्धक एका ठिकाणी उभे असल्याचे दिसते. त्यावेळी रोहित शेट्टी हा चालत येतो तेव्हा रोहितला पाहताच शिव त्याच्याबरोबर हात मिळवतो. त्यानंतर हे सर्व स्पर्धक पोझ देत फोटो काढताना दिसतात. याआधी शिव ठाकरे यांनी अभिनेत्री डेझी शाहचा एक व्हिडिओ शेअर केला होता, जो चाहत्यांना खूप आवडला होता. डेझीने सलमान खानसोबत ‘जय हो’, ‘रेस 3’सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
View this post on Instagram
‘खतरो के खिलाडी’ 13च्या पर्वामध्ये शिव ठाकरे, रोहित रॉय, अंजली आनंद, डेझी शाह, ऐश्वर्या शर्मा, अर्चना गौतम, अंजुम फकीह, अरिजित तनेजा, रुही चतुर्वेदी, नायरा बॅनर्जी, शीझान खान हे कलाकार दिसणार आहेत. त्याबरोबरच या कार्यक्रमात बिग बॉस फेम अब्दु रोजिक सुद्धा पाहुणा कलाकार म्हणून सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.