सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे विनायक राऊत विजयी झाले असून त्यांनी निलेश राणे यांना पराभूत केले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात आज सकाळी साडेआठ वाजल्यापासून भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात मतमोजणी सुरू झाली. महायुतीचे विनायक राऊत सकाळपासून आघाडीवर होते.
२०१४’च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील या मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला होता. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्ता राखणार असल्याचे चित्र दिसत आहे.
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे विनायक राऊत विजयी, निलेश राणे पराभूत#लोकसभानिवडणूक२०१९ #महाराष्ट्र #सिंधुदुर्ग #LokSabhaElections2019 pic.twitter.com/GLyquwZ6u8
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) May 23, 2019