नायडूंच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राजधानी दिल्लीत लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनास दिवसभरात विविध विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी नायडू यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. दरम्यान, एनडीएतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपोषणस्थळी भेट दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राऊत यांनी नायडू यांची भेट घेऊन त्यांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असूनही दोन्ही पक्षांमध्ये अजूनही युतीबाबत बोलणी न झाल्याने संभ्रमावस्था असतानाच राऊत यांनी नायडू यांच्या व्यासपीठावर जाऊन यात आणखी भर पाडली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)