फडणवीसांच्या टीकेवर शिवसेनेचा खोचक टोला

मुंबई –  आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारनं आता मेट्रोचं कारशेड थेट कांजूरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र  आता केंद्रानं कांजूरमार्गमधील जागेवर दावा सांगितला आहे. तसं पत्र केंद्राच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागानं (डीपीआयआयटी) राज्य सरकारला पाठवलं आहे.त्यामुळे पुन्हा एकदा मेट्रो कारशेडवरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा वाद पेटला आहे.  “मंद बुद्धी, बहु गर्वी, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा?”, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

मंद बुद्धी, बहु गर्वी, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा?

आता यावर शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी  अमृता फडणवीसांच्या ट्वीटला कोट खोचक टोला लगावला आहे.

काय म्हणाल्या यामिनी जाधव

“हा प्रश्न देवेंद्रजीना विचारला असता तर बरे झाले असते. दिल्लीच्या नादाला लागून त्यांनी महाराष्ट्र गुजरातला न्यायचा प्रयत्न केला होता. वर्षभरापासून तो पूर्वपदावर येत आहे. काळजी नसावी. बाकी “अल्प बुद्धी” दिसतेच आहे,” अशी खोचक टीका यामिनी जाधव यांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.