शिवसेनेचं हिंदुत्व ‘भेसळयुक्त’ झालंय: भाजपच्या ‘या’ नेत्याची सेनेवर सडकून टीका

सिंधुदुर्ग : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमी सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. त्यातच आता शिवसेनेने घेतलेला गुजराती मेळावा हा स्वतःचा तोटा भरून काढण्यासाठी केलेला प्रयत्न असून शिवसेनेचे भेसळयुक्त हिंदुत्व झालंय. त्यातून त्यांचं व्होट बॅक घसरली आहे. त्यामुळे शिवसेना शेवटच्या क्षणाला केलेला हा डिस्प्रेट प्रयत्न आहे.”, अशी घणाघाती टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी बोलताना केली आहे.

राज्यात भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांसारख्या बड्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावरुनही शेलार यांनी टीका केली. आशिष शेलार म्हणाले की, “पोलिसांनी जनतेची सुरक्षा करावी हे अपेक्षित आहे. याच भूमिकेतून जर राज्य सरकारचा निर्णय असेल तर त्यावर टीका उगाच करावी, अशी आमची इच्छा नाही. मात्र ज्या पद्धतीने त्या यादीमधे भाजपच्या आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांची सुरक्षा काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, त्याचं वर्णन करायचं तर असुरक्षित मनोवृत्तीच्या सरकारने घेतलेला हा निर्णय आहे. या सरकारची मनोवृत्तीच असुरक्षित आहे.” असा टोला त्यांनी लगावला.

हे सरकार असुरक्षित मनोवृत्तीत काम करतंय. त्यामुळे अजून एक चुकीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय कोणत्याही वैज्ञानिक किंवा अभ्यासाच्या दृष्टीकोणातून न घेता राजकीय दृष्टीकोणातून घेण्यात आला आहे.”,असेही ते पुढे बोलताना म्हणाले.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त नेमण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली. त्याचबरोबर त्यांनी शिवसेनेवरही टीका केली आहे. शिवसेनेसोबत सत्तेत बसलेल्या कॉंग्रेसच्या मंत्र्याने मुंबई महापालिका विभाजनाची मागणी केली आहे. मुंबईला विभाजीत करण्याच्या कॉंग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेची मुक संमती आहे. असा दावाच यावेळी बोलताना आशीष शेलार यांनी केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.