गुंडागर्दी करणे शिवसेनेची सवय – रामदास आठवले

मुंबई  – मदन शर्मा यांच्यावर एवढा हल्ला झाला, या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता. परंतु, सरकार त्यांचे असल्याने पोलिसांवर दबाव आणून साधारण केस दाखल केली.

नौदलाच्या अधिकाऱ्यावर अशाप्रकारे हल्ला करणे चांगली गोष्ट नाही. अशाप्रकारे गुंडागर्दी करणे शिवसेनेची सवय आहे, असे म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेवर टीका केली.

आक्षेपार्ह व्यंगचित्र फॉरवर्ड केले म्हणून माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शुक्रवारी शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आली. यात जखमी झालेल्या मदन शर्मा यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. यानंतर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी त्यांची घरी जाऊन भेट घेतली.

यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवत, शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. शिवाय, मदन शर्मांवर अन्याय झाला असून, याबाबत आपण केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही आठवले यांनी यावेळी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.