मुंबई – विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेकडून दावा करण्यात आला आहे. या पदावर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांची वर्णी लागणार आहे. दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती करावी, अशी शिफारस उपसभापती यांच्याकडे शिवसेनेकडून करण्यात आली आहे, अशी माहिती खासदार अरविंद सांवंत यांनी दिली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज शिवसैनिकांसोबत संवाद साधला. यावेळी अरविंद सावंत यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी अरविंद सावंत यांनी ही माहिती दिली.
सावंत म्हणाले, महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांशी विचारविनिमय करूनच निर्णय घेत आहोत. संख्येचा विचार केल्यास संख्याबळ पण आमच्याकडे आहे. शिवाय आपसातील समन्वय देखील आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती होईल, असा विश्वास सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.