बिहारमधील प्रादेशिक पक्ष शिवसेनेशी हातमिळवणी करण्यास इच्छुक

मुंबई – बिहार विधान निवडणुकीच्या आखाड्यात आता शिवसेनाही उतरली आहे. विधानसभेच्या 50 जागांवर सेना आपले उमेदवार देणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली.

बिहारमधील प्रादेशिक पक्ष हे शिवसेनेशी हातमिळवणी करण्यासाठी इच्छुक आहेत. त्या पक्षांबाबतही निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र येत निवडणूक लढवू शकते असे संकेतही त्यांनी दिले.

देसाई म्हणाले, सुशांतसिंह राजपूत प्रकरणात खोटा प्रचार करण्यात आला. खोटी माहिती पसरविण्यात आली. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान भाजपने केले आहे, पण आता सत्य समोर आले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हे भाजपकडून निवडणुकीचे नियोजन करत असून त्यांनी महाराष्ट्राची बदनामी करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्‍वर पांडे यांच्या विरोधातही शिवसेना आपला उमेदवार देणार आहे.

दरम्यान, सुशांत सिंह हा बिहारचा असल्याने त्याच्या मृत्यू प्रकरणावरून बिहारमध्ये मोठे राजकारण झाले होते. सुशांतला न्याय मिळाला पाहिजे, असे म्हणत भाजप आणि जनतादल युनायटेडने हा मुद्दा प्रचारात उतरविण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, आणि एम्सच्या निर्वाळ्यानंतर परिस्थिती बदलली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.