राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार – विजय वडेट्टीवार

मुंबई : राज्यात स्थिर सरकार स्थापण करण्यासाठी शिवसेना-कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यासाठी शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकांचे सत्र अद्यापही सुरु आहे. नवी दिल्लीत सकाळपासून कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरु असून यावेळी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासमोर एकसुत्री कार्यक्रम मांडण्यात आला. अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नसीम खान, नितीन राऊत, मल्लिकार्जुन खरगे, सी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसची बैठक सुरु आहे. दरम्यान कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट केले.

विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यात आले असल्याचे स्पष्ट केले असून पहिल्या कार्यकाळात मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असावे अशी चर्चा असल्याची माहिती दिली आहे. बैठकीत – फॉर्म्युलावर चर्चा सुरु असून कोणाकडे किती कालावधी असावा यावर चर्चा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान कॉंग्रेस कार्यकारिणीने शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी हिरवा कंदील दिला असल्याची सुत्रांची माहिती आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)