शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार- नवाब मलिक

मुंबई – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही सरकार स्थापनेसंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात चर्चा सुरु आहेत. अशातच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात महाशिवआघाडीचे सरकार येण्याची चिन्हे दिसत आहेत.

मलिक म्हणाले कि, “राज्यात मुख्यमंत्री हा सेनेचाच होईल, शिवसेना ज्या स्वाभिमानासाठी युतीतून वेगळी झाली आहे. तो स्वाभिमान आणि सन्मान जपणे आमची जबाबदारी आहे”. असं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलं आहे. त्यामुळे राज्यात शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळणार यावर मलिक यांनी प्रकाश टाकला आहे.

तसेच, काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार कि सत्तेत सहभागी होणार हे सुद्धा लवकरच ठरेल. महाराष्ट्राला सक्षम असे पर्यायी सरकार देणे हीच सध्या काळाची गरज आहे. असं देखील नवाब मलिक यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.