Dainik Prabhat
Wednesday, June 29, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

शिवसेनेने काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले,”विरोधकांनी एकजुटीसाठी पाऊल पुढे टाकणे म्हणजे ‘त्यांचा’ जीर्णोद्धार करणे..”

by प्रभात वृत्तसेवा
March 31, 2022 | 9:09 am
A A
शिवसेनेने काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले,”विरोधकांनी एकजुटीसाठी पाऊल पुढे टाकणे म्हणजे ‘त्यांचा’ जीर्णोद्धार करणे..”

मुंबई : देशातील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन भाजप विरोधी आघाडी निर्माण करण्याचे काम करण्याचे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. भाजपाने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप ममता यांनी केला आहे. वार हल्ला केला आहे आणि आता या जुलमी राजवटीचा एकजुटीने सामना करण्याची वेळ आली आहे.” असे म्हणत त्यांनी विरोधकांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यांच्या या पुढाकाराचे शिवसेनेने तोंडभरून  कौतुक केले असून दुसरीकडे  सामनाच्या अग्रलेखामधून काँग्रेस नेतृत्वावर निशाणा देखील साधला आहे.

सर्व ‘पुरोगामी’ शक्तींनी एकत्र येऊन भाजपाच्या मनमानी, एकाधिकारशाहीशी लढा द्यावा, असे ममतांनी काँग्रेससह अन्य पक्षांच्या प्रमुखांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ममतांनी हे पत्र काँग्रेसच्या प्रमुखांनाही लिहिले आहे. म्हणजे काँग्रेसशिवाय विरोधकांची एकजूट शक्य नाही हे त्यांनी मान्य केले,” असे शिवसेनेने म्हटले आहे.. “काँग्रेस हा विरोधी पक्ष म्हणून टिकलाच पाहिजे. काँग्रेस संपता कामा नये, असे मत नितीन गडकरींसारख्या भाजपाच्या नेत्याने, केंद्रीय मंत्र्याने मांडले. याचा अर्थ असा की, दिल्लीत सध्या जी राजकीय व्यवस्था आहे, त्यांना विरोधी पक्षाचे अस्तित्वच नष्ट करायचे आहे. अशी तयारी काही मंडळींनी सुरूही केली आहे.

“पंजाबात ‘आप’ने निवडणुका जिंकल्या. भगवंत मान मुख्यमंत्री झाले. त्यांनी जनहिताचे काही निर्णय धडाक्यात घ्यायला सुरुवात करताच केंद्राने राजधानी चंदिगढमध्ये त्या राज्याच्या विरोधात अधिकाऱ्यांना फितवायला सुरुवात केली. पंजाबातील सरकार लोकशाही मार्गाने, प्रचंड बहुमताच्या आधारावर सत्तेवर बसले आहे. जसे बहुमत उत्तर प्रदेशात व अन्य राज्यांत भाजपाला मिळाले तसेच ते पंजाबात ‘आप’ला मिळाले. ‘आप’ आता हिमाचल, हरयाणात कामास लागला आहे. त्यामुळे घाबरून केंद्राने त्यांच्या नाड्या आवळायला सुरुवात केली आहे. म्हणूनच ममता बॅनर्जी यांच्या एकजुटीच्या आवाहनास अरविंद केजरीवाल प्रतिसाद देणार आहेत काय?,” असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रासारख्या राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून भाजपा येथील महाविकास आघाडी सरकार उलथवू पाहत आहे. तेलंगणा, तामीळनाडू, केरळातही विरोधकांची सरकारे अस्थिर करण्याचे डावपेच सुरूच आहेत. शिवाय ज्या भाजपाशासित राज्यांतला विरोधी पक्ष सक्रिय व लोकाभिमुख आहे, तेथे विरोधकांवर दाबदबावाचे प्रयोग चालले आहेत. झारखंड, छत्तीसगढ भाजपाच्या टार्गेटवर आहेत. ज्या राज्याचे मुख्यमंत्री ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटास करमुक्त करणार नाहीत ते सर्व देशाचे दुश्मन असे या मंडळींनी ठरवून टाकले आहे!,” असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

“अशा मानसिकतेतून देशाला बाहेर काढणारे नेतृत्व विरोधी पक्षांत आहे काय? असेल तर त्यावर एकमताची मोहोर उठेल काय? ते घडणार असेल तरच ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या एकजुटीच्या प्रयत्नास काही अर्थ आहे. भाजपाप्रणीत ‘एनडीए’ उरलेले नाही, पण काँग्रेसप्रणीत ‘यूपीए’ तरी आज कोठे दिसत आहे काय? यूपीएत नक्की कोण आहे व त्यांचे काय चालले आहे याबाबत शंका आहे. विरोधकांनी एकजुटीसाठी पाऊल पुढे टाकणे म्हणजे सर्वात आधी ‘यूपीए’चा जीर्णोद्धार करणे. ‘यूपीए’चा सातबारा सध्या काँग्रेसच्या नावावर आहे. त्यात बदल केल्याशिवाय विरोधकांची भक्कम एकजूट होणे शक्य दिसत नाही,” असे स्पष्ट मत शिवसेनेने व्यक्त केले आहे.

“पाच राज्यांतील पराभवानंतर काँग्रेस पुढाकार घेऊन निदान ‘यूपीए’च्या जीर्णोद्धारासाठी विरोधकांना साद घालेल या अपेक्षेत सगळे होते. काँग्रेस पक्षाचे स्वतःचे काही अंतर्गत, कौटुंबिक प्रश्न असू शकतात, पण हे प्रश्न विरोधकांच्या एकजुटीतील अडथळे ठरू नयेत. शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, केजरीवाल, के.सी. राव, एम. के. स्टॅलिन हे सर्व तालेवार लोक आहेत व नव्या एकजुटीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा होणे आवश्यक आहे. यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला नाही म्हणून ममता बॅनर्जी यांना पुढे यावे लागले. त्यांनी ‘पुरोगामी’ शक्तींना साद घातली आहे. पुरोगामी म्हणजे फालतू सेक्युलरवाद नाही.

उत्तर प्रदेशात भाजपाचा विजय झाला तो समोरच्यांना सेक्युलरवादाचे अजीर्ण झाल्यामुळे. देश सगळय़ांचा आहे, पण बहुसंख्य हिंदू समाज देशाचा मुकुटमणी आहे. हिंदुत्व आणि हिंदू समाजाइतका सहिष्णू आणि पुरोगामी समाज जगाच्या पाठीवर दुसरा नाही. विरोधकांच्या नव्या आघाडीने या विचाराचे भान ठेवले तरच भाजपाविरोधी आघाडीस बळ मिळेल व ‘यूपीए’चा जीर्णोद्धार शक्य आहे. नाहीतर ‘येरे माझ्या मागल्या’चा पुढचा अंक सुरूच राहील,” असे शिवसेनेने  म्हटले आहे.

Tags: callingcongressMaharashtra newsmamata banerjeeoppositionpraisesshivsenaUnite

शिफारस केलेल्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्रहितासाठी…
महाराष्ट्र

शिंदे यांचा ठाकरेंना सवाल; ‘याचा’ अर्थ काय?

2 hours ago
भूलथापांना बळी पडू नका , समोर या बसून मार्ग काढू : बंडखोरांना उद्धव ठाकरेंचे भावनिक आवाहन
latest-news

भूलथापांना बळी पडू नका , समोर या बसून मार्ग काढू : बंडखोरांना उद्धव ठाकरेंचे भावनिक आवाहन

8 hours ago
#BREAKING NEWS : ‘या… मला अटक करा…’ ED च्या समन्स नंतर संजय राऊत यांचा एल्गार
latest-news

संजय राऊतांना ED ने वेळ वाढवून दिली

9 hours ago
महाविकासआघाडी सरकार बुचकळ्यात ! शिंदेनी शिवसेनेसमोर ठेवले ‘हे’ प्रस्ताव
Breaking-News

50 आमदार स्वत:च्या मर्जीने आले, लवकरच मुंबईत येणार : एकनाथ शिंदे

10 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती नगरीत स्वागत

मविआ सरकार अल्पमतात! राज्यपालांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

राजकीय घडामोडीचा अंत समीप; भाजपकडून बहुमत चाचणीची राज्यपालांकडे मागणी

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील भाजपचे प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीला

एका व्यक्तीच्या बढतीने संपूर्ण समुदायाचा विकास होत नाही; मुर्मू यांच्याबाबत यशवंत सिन्हांची भूमिका

कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

ओएनजीसीचे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले; चौघांचा मृत्यू

नुपूर शर्मांना पाठिंबा देणाऱ्या दुकानदाराची हत्या

राज्यात 7231 पोलीस शिपाई भरती प्रक्रिया; पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार

पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या; मंत्रिमंडळ बैठकीत खरीप हंगामाचा आढावा

Most Popular Today

Tags: callingcongressMaharashtra newsmamata banerjeeoppositionpraisesshivsenaUnite

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!