Shiv Sena UBT Rebel Leaders । राज्यतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बंडखोरांवर मोठी कारवाई केली आहे. बंडखोरांवर कारवाई करताना उद्धव ठाकरे यांनी पक्षविरोधी कारवायांमुळे पाच नेत्यांची हकालपट्टी केली आहे. त्यात भिवंडीचे माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगुल, संजय आवारी, प्रसाद ठाकरे यांचा समावेश आहे.
रुपेश म्हात्रे यांची हकालपट्टी Shiv Sena UBT Rebel Leaders ।
शिवसेनेचे भिवंडी लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रुपेश म्हात्रे यांची पक्षविरोधी कारवायांमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. रूपेश म्हात्रे यांनी भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, परंतु पक्षविरोधी वक्तव्ये आणि कारवायांमुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली. मात्र, त्यावेळी त्यांनी अर्ज मागे घेतला होता.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने माहिती दिली Shiv Sena UBT Rebel Leaders ।
याशिवाय वणी विधानसभा जिल्हाप्रमुख विश्वास नांदेक, झरी तालुकाप्रमुख चंद्रकांत घुगुल, मारेगाव तालुकाप्रमुख संजय आवारी, यवतमाळ जिल्ह्याचे वणी तालुकाप्रमुख प्रसाद ठाकरे यांचीही पक्षविरोधी कारवायांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने दिली आहे.