संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर राजकारण तापलं; भाजप नेत्याची टीका

मुंबई – राज्यात कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे सर्व सण, उत्सवांवर बंधनं घालण्यात आली आहेत. लोकांनी गर्दी करू नये अशा सुचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. मात्र, शिवसेना दसरा मेळावा व्यासपीठावरच होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्यासपीठावरूनच भाषण करणार, असं
वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

त्यांच्या या वक्तव्यावर भाजपा नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी खोचक टीका केली आहे. दरेकर म्हणाले, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सभा उद्घाटन पॅटर्न बदलू नये. राम मंदिर ऑनलाइन उद्घाटन करा, असे म्हणणारे संजय राऊत हे दसरा मेळावा का घेत आहेत, असा सवालही प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत ?

शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून हा पहिलाच दसरा मेळावा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण व्यासपीठावरूनच होईल, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

तसेच दसरा मेळाव्याचे महत्व राजकीय आणि सांस्कृतीक देखील आहे. त्यामुळे दसरा मेळावा कसा घ्यायचा याबाबत चर्चा होणार आहे. कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून कार्यक्रम पार पाडता येईल, अशा पद्धतीनं नियोजन करण्यात येईल, असेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.