मुंबई – शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीत 50 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती या पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी आज येथे दिली.
ते म्हणाले की, या राज्यात आमची कोणत्याहीं पक्षाबरोबर आघाडी असणार नाही. ज्या मतदार संघात आमचे कार्यकर्ते सक्रिय आहेत अशाच मतदार संघात आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी नमूद केले.
या निवडणुकीतील शिवसेनेची निवडणूक निशाणी तुतारी वाजवणारा माणूस अशी असणार आहे. शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण असे आहे, पण बिहारच्या सत्ताधारी जेडीयु पक्षाचे चिन्हीही बाण हेच असल्याने निवडणूक आयोगाने शिवसेनेला येथे त्यांचे अधिकृत चिन्ह वापरण्यास अनुमती नाकारली आहे.
त्यामुळे तेथे हे पर्यायी निवडणूक चिन्ह घ्यावे लागले आहे असे त्यांनी सांगितले. शिवसेनेने आपल्या 22 स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली आहे.