मुंबई : राज्यात भाजपबरोबर सत्तासंघर्ष सुरु असतानाच शिवसेनेसाठी एक आनंददायी बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. यड्रावकर यांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ 64 पर्यंत गेले आहे.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सोमवारी ‘मातोश्री’ येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाठिंबा दिला.
#कोल्हापूर जिल्ह्यातील #शिरोळ विधानसभा मतदारसंघातून #अपक्ष निवडून आलेले आमदार राजेंद्र पाटील यद्रावकर यांनी आज #मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत शिवसेनेला पाठिंबा दिला. pic.twitter.com/vaJDNcdxr0
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 4, 2019
यापुढील काळात शिवसेनेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याचे राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले. मुळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असलेले राजेंद्र पाटील यांनी बंडखोरी करत शिरोळ मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
शिरोळ मतदारसंघ कॉंग्रेस-राष्ट्रवादीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडला होता. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.