शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव; राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान

मुंबई: महाराष्ट्रातील राज्यपालांनी पक्षाला सरकार स्थापण्याची क्षमता सिद्ध करण्यासाठी दिलेला कालावधी न वाढविण्याच्या निर्णयाला आव्हान देत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अ‍ॅडव्होकेट सुनील फर्नांडिज यांनी शिवसेनेकडून याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्यानंतर राज्यपालांनी तसं पत्रंच केंद्रीय गृहमंत्रालयाला दिलं आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाने या शिफारसीला मंजुरी दिली आहे. राष्ट्रपती कोविंद यांच्याकडून आदेशावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

शिवसेनेने राज्यपालांनी संख्याबळ सिद्ध करण्यासाठी वेळ वाढवून न दिल्यामुळे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. राज्यपालांनी शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला देखील सत्तेसाठी निमंत्रण दिले होते. रात्री साडे आठ वाजेपर्यंत राष्ट्रवादीला वेळ दिला होता. मात्र त्यापूर्वीच राज्यात राष्ट्रपती लागवट लागू झाल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

Shiv Sena files petition in Supreme Court challenging Maharashtra Governor’s decision to not extend the time given to the party to prove their ability to form government. Advocate Sunil Fernandez has filed the plea for Shiv Sena. pic.twitter.com/vVbZqCdtH5

— ANI (@ANI) November 12, 2019

Leave A Reply

Your email address will not be published.