राजगरूनगर- करोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र जनजीवन ठप्प झाले आहे. लॉकडाऊनमुळे कर्तव्य बजावण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी अहोरात्र उभे आहे. लॉकडाऊनमुळे सर्व हॉटेल मेस बंद असल्याने राजगुरूनगरमध्ये तैनात असणाऱ्या पोलिसांच्या जेवणाची सोय शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
शहरात ड्युटीवर असलेल्या पोलीस व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांना शिवसेना खेड तालुक्याच्यावतीने पुणे जिल्हा समन्वयक, ऍड. गणेश सांडभोर, युवानेते तुषार सांडभोर, शिल्पा थिगळे, कैलास गोपाळे, पंकज गारगोटे, नवनाथ कोतवाल यांच्यावतीने राजगुरूनगर पोलीस ठाणे, चांडोली टोलनाका, होलेवाडी चव्हाण मळा, कंरडेवस्ती येथील चेकपोष्टवरील कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना दुपारचे जेवण वाटप देण्यात आले.