छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांचा विरोध

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री सचिन अहिर यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेनेच्या प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, मात्र शिवसैनिकांकडून भुजबळ यांच्या सेना प्रवेशास विरोध होताना दिसत आहे.

छगन भुजबळ शिवसेनेत येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. तसे संदेशही सोशलमीडियावर फिरत होते. याच आधारावर शिवसैनिकांनी भुजबळांच्या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवला आहे. शिवसेनेचे रविंद्र तिवारी यांनी विरोध दर्शवणारी पोस्टर मुंबईच्या प्रमुख ठिकाणी लावली आहेत. पोस्टरवर छगन भुजबळ यांचे एक कार्टून काढून लखोबा लोखंडे असे भुजबळांना संबोधित केले आहे. साहेबांना दिलेला त्रास आम्ही विसरू शकत नाही. आपण जिथे आहात तिथेच रहा, असा सल्लादेखील देण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.