अकोला – आपले पती अचानक गायब झाले असल्याची तक्रार अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने पोलिसांत दाखल केली आहे. त्यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी अकोलाच्या सिव्हील लाईन्स पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे.
सोमवारी रात्रीपासून आपले पती गायब झाले असून पोलिसांनी त्यांना शोधून काढावे, अशी मागणी त्यांनी पोलिसांना केली आहे. देशमुख हे एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गुजरातच्या सूरत शहरात आश्रयाला गेले असल्याचे सांगण्यात येते.
आमदार देशमुख यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क झालेला नाही. त्यामुळे ही तक्रार दाखल केली गेली आहे की देशमुख यांनीच त्यांना बळजबरीने नेले गेले असल्याने त्यांनी कुटुंबीयांमार्फत ही तक्रार नोंदवली आहे याची चर्चा आता सुरू झाली आहे.