शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सातारा देवळाईतील रस्ते कामाच्या कंत्राटावरून जोरदार हाणामारी झाली.

त्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच शिवसेनेचे पश्‍चिम विधानसभा संघटक सुशील खेडकर यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. मागील अनेक दिवसांपासून आमदार शिरसाट आणि पश्‍चिम विधानसभा संघटक सुशील खेडकर यांच्यात सातारा देवळाईतील रस्ते कामाच्या कंत्राटावरून वाद सुरु आहे.

यातूनच शनिवारी (18 जानेवारी) दुपारी कोकणवाडी येथील आमदार शिरसाट यांच्या कार्यालयासमोर दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. या घटनेत खेडकर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार शिरसाट यांच्या जखमी समर्थकांनी देखील घाटीत जाऊन उपचार घेतले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.