शिवसेना आमदार रायमूलकर यांच्या वाहनाला भीषण अपघात

बुलडाणा :  मेहकर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या वाहनाला शुक्रवारी रात्री अपघात झाला. या अपघातात संजय रायमूलकर यांच्यासह 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने औरंगाबादला हलवण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात मेहकर विधानसभा मतरदारसंघाचे शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या वाहनाला नायगाव दत्तपूर गावाजवळ अपघात झाला आहे.

या अपघातात आमदार रायमुलकर यांच्यासह त्यांच्या गाडीचा चालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यासोबतच रायमुलकर यांचे बॉडीगार्डही गंभीर जखमी झाले आहे. रायमुलकर यांची गाडी मेहकरकडे येत असताना त्यांच्या इकोस्पोर्ट आणि मेटॅडोरची समोरासमोर धडक झाली.

ही धडक इतकी भीषण होती की, यात आमदारांची चारचाकी पलटी झाली. त्यासोबतच मेटॅडोर मेटॅडोरही पलटी झाला. या अपघाताची माहिती मिळताच शिवसैनिकांसह रायमुलकर यांच्या कार्यकर्त्यांनी मेहकरच्या मल्टी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.