शिवसेना आमदाराचे फेसबुक अकाऊंट हॅक

सायबर विभागाकडे तक्रार दाखल

पिंपरी – पिंपरीचे शिवसेना आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांचे फेसबुक अकाऊंट अज्ञात व्यक्तीने हॅक केले. ही घटना मंगळवारी (दि. ८) उघडकीस आली. यासंदर्भात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ॲड. चाबुकस्वार हे विधानसभा निवडणूकीसाठी पिंपरी मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीच्या तिकिटावर निवडणूक लढवित आहेत. सोशल मिडियासाठी ते व त्यांचे कार्यकर्ते वापरत असलेले फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे या सर्वांच्या लक्षात आले.

या अकाऊंटवरील मोबाईल नंबर, मेल आयडी, पासवर्ड व नावातही बदल केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तातडीने आयुक्तालयातील सायबर क्राईमकडे याप्रकरणी लेखी तक्रार दाखल केली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)