मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. कारण या प्रकरणी नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलिसांचे एक पथक चिपळूणला रवाना झाले आहे. नारायण राणेंना अटक करुन कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश आहेत.
‘सिंहाच्या गुहेत प्रवेश करण्याची हिंमत करु नका. आम्ही वाट पाहत आहोत’
नारायण राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना दरम्यान चिपळूणमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. नारायण राणेंकडून अटक टाळण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेचे नाशिकमधील शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत अटकेचे आदेश दण्यात आले आहेत. दरम्यान महाडमध्येही नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘अंगात काय चुडैल घुसली की काय ?’ शिवसेना नेत्याची खोचक टीका
या प्रकरणावर शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. यांच्या अंगात काय चुडैल घुसली की काय, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
ते पुढे म्हणाले,’माजी मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री असलेल्या व्यक्तीने विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या बाबत काय बोलावे याचे भान ठेवले पाहिजे, मात्र हे भान हरपलेल्या नारायण राणे यांना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करून शॉक दिला पाहिजे, अशी टीका पाटील यांनी केली आहे. यांच्या अंगात काय चुडैल घुसली की काय, असं गुलाबराव पाटील म्हणाले.