पुरंदर : पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा धक्कादायक निकाल समोर येत आहे. शिवसेना नेते विजय शिवतारे हे पराभवाच्या छायेत असल्याचे दिसत आहे.
कॉंग्रेस उमेदवार संजय जगताप यांनी तब्बल ११ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे शिवसेना पुरंदर हा बालेकिल्ला गमवणार असल्याचे दिसत आहे. दोन्ही नेते तुल्यबळ असल्याने कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचेचं लक्ष लागले होते. अखेर संजय जगताप यांनी आघाडी घेतल्याने विजय शिवतारे हे धोक्यात असल्याचं दिसत आहे.