Shivsena Leader : महाराष्ट्र हादरला..! शिंदेंच्या शिवसेना नेत्यावर भररस्त्यात गोळीबार; राजकीय वर्तुळात खळबळ
Shivsena Leader : शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्यावर भररस्त्यात गोळीबार झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.

Shivsena Leader : श्रीरामपूर शहरात शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत गोळीबार केला. सुदैवाने हल्लेखोरांचा नेम चुकल्याने प्रशांत कहाणे हे या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. (Shivsena Leader)
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास गोंधवणी परिसरात ही घटना घडली. प्रशांत कहाणे हे त्यांच्या चारचाकी वाहनातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या वाहनाच्या दिशेने गोळीबार केला. चालत्या वाहनावर झालेल्या या हल्ल्यामुळे काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली. (Shivsena Leader)
गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर प्रशांत कहाणे सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. (Shivsena Leader)

Shivsena Leader : शिंदेंच्या शिवसेना नेत्यावर भररस्त्यात गोळीबार; राजकीय वर्तुळात खळबळ
हल्ल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. (Shivsena Leader)
प्रशांत कहाणे यांच्यावर हल्ला का करण्यात आला, यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद, राजकीय कारण किंवा इतर कोणता हेतू होता का, याचा सर्व अंगांनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Shivsena Leader)
भररस्त्यात राजकीय पदाधिकाऱ्यावर झालेल्या या गोळीबारामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (Shivsena Leader)





