मुंबई – राज्यात सद्या आमदार, खासदार व मंत्री यांना करोना लागण झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच शिवसेना नेते व माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांना करोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे. याशिवाय संपर्कात आलेल्या सर्वांना करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.!
— Arvind Sawant (@AGSawant) January 4, 2022
”माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.!” असे ट्वीट अरविंद सावंत यांनी केले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. यासह मंत्रीमंडळातील अनेत नेत्यांना करोनाचा फटका बसला आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार, वर्षा गायकवाड, भाजपचे नेते राधाकृ्ष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, कॉग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेनचे मंत्री एकनाथ शिंदे यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.