जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव; मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
वडूज (प्रतिनिधी) – शिवसेना पक्ष हा जनतेच्या हितासाठी काम करणारा पक्ष आहे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांनी केले. वडूज येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खटाव तालुका शिवसेनेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख चांद्रकांत जाधव, उप तालुकाप्रमुख संजय भोसले, तालुका प्रमुख युवराज पाटील, शहर प्रमुख सुशांत पार्लेकर, उपशहर प्रमुख सुधीर गोडसे व किशोर गोडसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रकांत जाधव म्हणाले, पक्ष प्रमुख व विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सुचनेनुसार आम्ही कोणत्याही प्रकारचे फ्लेक्स, जाहिरातबाजी न करता जनतेच्या हितासाठी हा रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच यावेळी लोकांना मास्क वाटप केले आहे.
दि. 27 रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यात ज्या ठिकाणी शाखा नाहीत त्या ठिकाणी शाखा उद्घाटन करून हा वाढदिवस साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आबासाहेब भोसले, विभाग प्रमुख संतोष दुबळे, नीलेश खुस्पे, राजेंद्र जगदाळे, सतीश माने, अनिल घोरपडे, संदीप बनसोडे, मनोज कांबळे, सचिन खंडागळे, दीपक देशमुख, सागर पवार, मुयर पाटील, प्रमोद देशमुख, सोमनाथ काळे, किशोर राऊत आदी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.