शिवसेनेने भगव्या झेंड्याचा अपमान केला

देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई – देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार सुरु केला. यावेळी त्यांनी वृत्तमाध्यमांशी बोलतांना शिवसेनेवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना सत्तेत बसली आहे. मग त्यांचा कुठला भगवा, त्यांच्या भगव्यात भेसळ झाली आहे.’

फडणवीसांच्या मुंबईवर भाजपचा शुद्ध भगवा फडकवण्याच्या वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

ते पुढे म्हणाले, ‘भगवा झेंडा हा आता शिवसेनेचा राहिलेला नाही. शिवसेना सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसली. त्यामुळे शिवसेनेने भगव्या झेंड्याचा अपमान केला आहे.’

भाजपचे ‘ते’ स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही

यापूर्वीही  देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता  मुंबई महापालिकेवर शुद्ध भगवा फडकवणारच असा निर्धार व्यक्त केला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.