पुणे – गणपती विसर्जनाची धामधूम सर्वत्रच आहे. परंतु, काही ठिकाणी उत्सवाला गालबोट लागताना दिसून येत आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत काही तरुण दारू पिऊन गोंधळ घालण्याचे अनेक प्रकार समोर येत असतात. यातच दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्याला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.