मुंबई – महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपने सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुमही अनेकदा विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले आहे. यावर शिवसेनेचे हिंदुत्व भाजपपेक्षा वेगळे असल्याचे शिवसेनेचे युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले कि, प्रत्येकाचा आदर करा, सन्मान करा. कर्म हीच आस्था हेच शिवसेनेचे हिंदुत्व आहे. मात्र भाजपचे हिंदुत्व राजकीय आहे. ते माय वे या हाय वे याचा अवलंब करतात. जर त्यांनी आपल्या हिंदुत्वाला योग्य मानले असते तर पीडीपी सोबत कसे गेले? आम्ही त्यांच्यासोबत होतो. परंतु त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. हेच का त्यांचे हिंदुत्व? त्यांचे एका राज्यात वेगळे हिंदुत्व दुसऱ्या राज्यात वेगळे हिंदुत्व असते. आमच्यासाठी हिंदुत्व राजकीय वस्तू नसल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
तसेच, जिथपर्यंत माझ्यावर वैयक्तिक हल्ला होण्याची गोष्ट आहे. तुम्ही फुटबॉल पाहिले असेल तिथे मेस्सी किंवा रोनाल्डो यांच्यासाठी मॅन टू मॅन मार्किंग केली जाते. त्यांनी गोल करु नये यासाठी घेरण्यात आलेले असते. कदातिच त्यांना माझ्यापासून भीती वाटत असेल, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे.