शिवसेनेनेही दिले होते काँग्रेसला समर्थन- जितेंद्र आव्हाड

मुंबई- मनसे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकही जागा लढवत नाहीए. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचा प्रचार करणार असल्याचेही जाहीर केले आहे. त्यासाठी ते राज्यात ९ ठिकाणी आघाडीसाठी प्रचार सभाही घेणार आहेत. यातच शिवसेना-भाजपाकडून मनसेने आघाडीला साथ देण्यावरुन टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला ट्विटद्वारे प्रश्न विचारले आहे की, ‘1980 सालच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने एकदेखील जागा लढवली नव्हती.शिवाय त्याच निवडणुकीत सेनेने काँग्रेसला समर्थन देखील दिल होत.आज राज ठाकरे देखील एकही जागा लढवत नाहीये,त्यांच्या नावाने शिमगा करणाऱ्या लेकरांच्यासाठी ही खास माहिती…!’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.