35 वर्षांनी सत्तांतर; नलवडेवाडी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा

उत्तमराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली 35 वर्षांनी सत्तांतर

वाठार स्टेशन (प्रतिनिधी) – कोरेगाव तालुक्‍यातील नलवडेवाडी ग्रामपंचायतीवर आतापर्यंत कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. गेली 35 वर्षे ग्रामपंचायतीची सत्ता त्यांच्या ताब्यात होती; परंतु शिवसेनेचे कोरेगाव तालुका संपर्कप्रमुख उत्तमराव नलावडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने यंदाच्या निवडणुकीत सत्तांतर घडवून आणले.

यंदाची ग्रामपंचायत निवडणूक शिवसेना पुरस्कृत जानाईदेवी शेतकरी संघर्ष पॅनेलने प्रस्थापितांच्या विरोधात जोमाने लढवली. या पॅनेलचे नेतृत्व शिवसेनेचे कोरेगाव तालुका संपर्कप्रमुख उत्तमराव नलावडे यांनी केले. त्यांनी प्रस्थापितांच्या विरोधात शिवसेनेचे संघटन गावात मजबूत केले. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी युवकांची फळी तयार केली.

ग्रामपंचायत निवडणुकीत या पॅनेलने सात उमेदवार उभे केले. उत्तमराव नलावडे यांनी निवडणूक प्रचाराचा झंझावात निर्माण केला. प्रस्थापितांना कडवी झुंज देत त्यांनी पाच उमेदवार भरघोस मतांनी निवडून आणले. तब्बल 35 वर्षांनी ग्रामपंचायतीत सत्तांतर करून दाखवले.

ग्रामपंचायत शिवसेनेकडे आल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असून आ. महेश शिंदे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.