शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही

मुंबई – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 7 वा स्मृती दिन आहे. याच पार्श्‍वभूमीवर राज्यभरातून शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. दरम्यान, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन करताना शिवसेनेला हिंदुत्व आणि स्वाभिमानाची आठवण करून दिली होती. स्वाभिमान आणि हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांना थेट प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही,” अशी टीका राऊत यांनी केली आहे. दरम्यान, आज दिवसभरात अनेक दिग्गज नेते या ठिकाणी येवून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.