Shiv Sena Crisis : शिवसेना (शिंदे गट) खासदार ज्योती वाघमारे यांनी राज्यात (Shiv Sena Crisis) लवकरच ‘ऑपरेशन टायगर’ होणार असल्याचे संकेत दिल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पुन्हा खळबळ उडाली होती. मात्र आता शिवसेना (Shiv Sena Crisis) ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी या विधानाला जोरदार प्रत्युत्तर देत खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात शिवसेना (ठाकरे गट) पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करताना आमदार वरुण सरदेसाई यांनी एकनाथ शिंदे गटावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “संपर्कात सगळेच सगळ्यांच्याच असतात. त्यांचे सुद्धा अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांकडे २२० आमदार आहेत, तर विरोधकांकडे फक्त ४० आमदार आहेत. तरीही त्यांना एवढी हाव का? तुमच्याकडे असलेले कार्यकर्ते घेऊन पुढे का जात नाही? वारंवार दुसऱ्यांनी जन्म घेतलेली पोरं का खांद्यावर घ्यावीशी वाटते?” सरदेसाई यांनी पुढे म्हटले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीने सत्तेचा आणि पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे सर्वांनी पाहिले. तरीही शिंदे गटाला ठाकरे गटातील आमदार-खासदारांना संपर्क साधण्याची गरज का भासते, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला. Shiv Sena Crisis पार्श्वभूमी काही दिवसांपूर्वी शिवसेना (शिंदे गट) खासदार ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरे गटातील आमदार आणि खासदार आपल्या संपर्कात असल्याचे जाहीर संकेत दिले होते. त्यांनी ‘ऑपरेशन टायगर’ लवकरच होणार असल्याचेही सूचित केले होते. यामुळे ठाकरे गटात पुन्हा फूट पडण्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर आमदार वरुण सरदेसाई यांनी आज नवी मुंबईत पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शिंदे गटावर तीव्र टीका करत प्रतिआक्रमण केले. त्यांनी सत्ताधारी महायुतीवर कुरघोडीचे राजकारण रंगवल्याचा आरोपही केला. सरदेसाई म्हणाले, “भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना राज्यात नावाला सत्तेत सहभागी आहेत, पण त्यांच्यात एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. तरीही ते ठाकरे गटाकडे लक्ष देणे थांबवत नाहीत.” ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट वरुण सरदेसाई यांच्या या विधानाने शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात (Shiv Sena Crisis) काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला असून, पक्षाने एकजुटीचे प्रदर्शन केले आहे. पक्ष सूत्रांच्या मते, स्थानिक निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात निर्माण झालेली मरगळ दूर करण्यासाठी ठाकरे गट आता अधिक आक्रमक होताना दिसत आहे. शिंदे गटाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.