Eknath Shinde : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर आता मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का बसला असून, शिंदे गटाचे युवा नगरसेवक विकी सिंग लबाना यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. (Eknath Shinde) उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत पॅनल क्रमांक 6 ‘अ’ मधून निवडून आलेल्या विकी सिंग लबाना यांनी ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवण्यासाठी ‘बंजारा’ जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र, जात पडताळणी प्रक्रियेदरम्यान त्यांच्या प्रमाणपत्रात त्रुटी आढळल्याने नाशिक जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले. (Eknath Shinde) यानंतर मनीषा आव्हाळे यांनी अधिकृत आदेश जारी करत विकी लबाना यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. या निर्णयामुळे उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Eknath Shinde) विशेष म्हणजे, आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाकडे महत्त्वाच्या राजकीय घडामोडी म्हणून पाहिले जात आहे. शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात असून विरोधकांकडूनही या मुद्द्यावरून टीका सुरू झाली आहे. (Eknath Shinde) दरम्यान, मुंबई महानगरपालिकेतील 79 नगरसेवकांच्या निवडीविरोधातही न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील काही प्रकरणांची सुनावणी सुरू असून, ही माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या कागदपत्रांतून समोर आली आहे. (Eknath Shinde)