मुंबई – लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता खाते वाटपावरून कुरबुरी सुरु झाल्या आहेत. अशातच शिवसेनेने आता लोकसभा उपाध्यक्षपदावर दावा केला आहे. शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत १८ जागांवर विजय मिळवला असून एनडीएतील दुसरा सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जास्त मंत्रिपदे मागितली आहेत. त्यांनी एनडीए सरकारमध्ये सहभागी असलेल्या एकमेव खासदारास चांगले खाते देण्याच्या मागणीवर जोर दिला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले की, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारमधील उच्चस्तरीय पदाधिकाऱ्यांना म्हटले आहे की, एनडीएतील दुसरा सर्वांत मोठा पक्ष असल्याकारणाने शिवसेनेचा उपाध्यक्ष पदावर नैसर्गिक हक्क आहे. आमच्या विनंतीवर सकारात्मक पद्धतीने विचार केला जाईल, अशी आम्ही अपेक्षा करतो.
Shiv Sena's Sanjay Raut on claim for Deputy Speaker in Lok Sabha: Humari yeh demand nahi hai, humara ye natural claim aur hakk hai, yeh pad Shiv Sena ko milna chahiye. pic.twitter.com/zMXqg9KN83
— ANI (@ANI) June 6, 2019