बाळासाहेब ठाकरेंचा आज 7 वा स्मृतीदिन

हजारो शिवसैनिक शिवतिर्थावर दाखल

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 7 वा स्मृती दिन आहे. याच पार्श्‍वभूमीवर राज्यभरातून शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. दरम्यान, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. आज दिवसभरात अनेक दिग्गज नेते या ठिकाणी येवून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाला राज्यातील हजारो शिवसैनिक शिवतिर्थावर बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दाखल होतात. मात्र यावेळच्या स्मृतीदिनाला वेगळी राजकीय पार्श्‍वभूमी मिळाली आहे. ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्‍ती निवडणूकीच्या मैदानात उतरून विधानसभेत गेली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने आजपर्यंतची भाजपसोबतची साथ सोडून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत एकत्र येवून सत्ता स्थापण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच मागील काही दिवसांपासून आजच्या दिवशी शिवसेनेच्याच मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे सेनेकडून सांगण्यात येत होते परंतू, प्रत्यक्षात तसे काही झाल्याचे दिसत नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.