मुंबई – बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शुभम शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभेसाठी रिक्त झालेल्या जागेवर आज मतदान होत आहे. या निवडणुकीत शिवसेना – भाजपमध्ये काटेकी टक्कर दिसून येत आहे. निवडणुकीत महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक असा लढा उभा राहिला आहे.
यातच शिवसेनेचे उमेदवार शुभम शेळके यांनी भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’शिवसेना विरोधात जे बेळगावात प्रचार करण्यासाठी आले त्यांनी स्वत:ला महाराष्ट्र्द्रोही असल्याचं सिद्ध केलं आहे.’असं म्हणत फडणवीसांना शेळके यांनी खोचक टोला लगावला आहे.
कार्यकर्त्यांनी डिपॉझिट, समितीने फॉर्म भरला, कोण आहेत शुभम शेळके?
-शुभम शेळके यांचं वय अवघे 26 वर्ष आहे.
-बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने शुभम विक्रांत शेळके यांचा फॉर्म भरला होता. समिती कार्यकर्त्यांनी डिपॉझिट भरले.
-सर्वसामान्य कुटुंबातील असणारे शुभम शेळके यांचा लहानपणापासूनच सीमाप्रश्न जवळचा संबंध होता.
-शुभम शेळके यांचं शिक्षण sslc झालं आहे. लहानपणापासून त्यांनी आंदोलन जवळून पाहिले आहे.
- सीमाप्रश्नाची झालेली वाताहतीमुळे त्यांनी युवासेनेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. मागील पाच वर्षात शैक्षणिक उपक्रम, मराठी शाळांना मदत यासोबत सीमा आंदोलनात भाग घेतला.
-युवा समितीने सीमा भागातील युवकांना एकत्रित करून, या चळवळींमध्ये युवकांना प्राधान्य दिले. त्यामुळेच आज शुभम शेळके यांना तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.
कार्यकर्त्यांनी डिपॉझिट, समितीने फॉर्म भरला, कोण आहेत शुभम शेळके?
शुभम शेळके यांचं वय अवघे 26 वर्ष आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने शुभम विक्रांत शेळके यांचा फॉर्म भरला होता. समिती कार्यकर्त्यांनी डिपॉझिट भरले. सर्वसामान्य कुटुंबातील असणारे शुभम शेळके यांचा लहानपणापासूनच सीमाप्रश्न जवळचा संबंध होता.
शुभम शेळके यांचं शिक्षण sslc झालं आहे. लहानपणापासून त्यांनी आंदोलन जवळून पाहिले आहे. सीमाप्रश्नाची झालेली वाताहतीमुळे त्यांनी युवासेनेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. मागील पाच वर्षात शैक्षणिक उपक्रम, मराठी शाळांना मदत यासोबत सीमा आंदोलनात भाग घेतला.
युवा समितीने सीमा भागातील युवकांना एकत्रित करून, या चळवळींमध्ये युवकांना प्राधान्य दिले. त्यामुळेच आज शुभम शेळके यांना तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.