मातोश्रीच्या बचावासाठी शिवसेना-भाजप युती ; राणेंची टीका !

मुंबई: चार वर्षात शिवसेना-भाजपमध्ये सूर असलेल्या निरर्थक शाब्दिक युद्धाला अखेर पूर्णविराम मिळाला. काल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी चाणक्य नीतीचा वापर करत भाजप-सेनेची युती केली. मात्र गेल्या ४ वर्षातील शिवसेनेनेची भूमिका भाजप विरोधात होती. शिवसेनेनेभाजपवर अत्यंत तीव्र शब्दात टीका केली. आणि आगामी निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे वेळोवेळी सांगितले. मात्र कला झालेल्या भाजप-सेना युतीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकीत मी भाजपवर प्रहार करणार नाही. काही गोष्टींचा संयम मी पाळणार आहे. त्यांनी मला खासदार बनवलं आहे,” असं नारायण राणे यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेवर टीका करताना राणे म्हणाले, शिवसेना-भाजपने एका भाजून सत्ता उपभोगली तर दुसरीकडे एकमेकांवर टीका केली. मातोश्रीच्या स्वार्थ आणि बचावासाठी ही युती झाली. तसेच युती झाली खरी पण याचा फायदा दोन्ही पक्षांना मिळणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.