शिवसैनिक एकत्रित राहून शिवसेना पुढे नेतील : माने 

नगर  – नगरमधील शिवसैनिक एकत्रित राहून शिवसेना पुढे नेतील, असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले. शिवसेनेचे प्रवक्ते व कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी (दि.13) नगरमध्ये शिवालयास भेट देऊन उपनेते स्व. अनिल राठोड यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले, याप्रसंगी खा. माने बोलत होते.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, विक्रम राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, गिरीश जाधव, अरुणा गोयल, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अनिल शिंदे, भगवान फुलसौंदर, संतोष गेनप्पा, संभाजी कदम, अनिल बोरुडे, गणेश कवडे, संजय शेंडगे, काका शेळके, निलेश भाकरे, सुभाष लोंढे, मदन आढाव, संग्राम शेळके आदी उपस्थित होते.
यावेळी माने म्हणाले, स्वर्गीय अनिल राठोड यांनी शिवसेना मोठी करण्यासाठी नगरमध्ये खूप मेहनत घेतली असून त्यांनी आपले जीवन शिवसेनेला समर्पित केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.