बुलढाणा – बुलढाण्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा झाल्यानंतर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे.ठाकरेंनी सभेमध्ये दिलेल्या आव्हानाला बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट ठाकरेंनी माझ्याविरोधात लोकसभा लढवावी असं प्रती आव्हान दिल होत. त्यानंतर आता ठाकरे गटाचे बुलढाणा जिल्हा संप्रर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी जाधव यांना प्रत्युत्तर दिल आहे.
ठाकरे यांनी बुलढाण्यात सभा घेत शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच बुलढाण्यात गद्दार आमदार खासदारांवर बोलताना, गद्दारांनी जाहीरपणे सांगावे की आम्ही भाजपच्या तिकिटावर लढणार नाही असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिल होत. त्यावर खासदार प्रतापराव जाधव यांनी ठाकरेंना प्रती आव्हान दिल आहे.
”माझं उद्धव ठाकरेंना आव्हान आहे की त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी इथून माझ्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवावी. मी शिवसेनेच्याच तिकिटावर लढणार. भाजपाच्या तिकिटावर लढण्याचा विषय येतो कुठे?” असं प्रतापराव जाधव म्हणाले. “आम्ही शिवसेना पक्षातच आहोत.बाळासाहेबांच्याच विचारांनी आम्ही चाललो आहोत”असाही जाधव यांनी यावेळी ठणकावून सांगितले.जाधव यांच्या याच आव्हानाला खेडेकर यांनी देखील आता प्रत्युत्तर दिल आहे.
“बुलढाणायातील ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख खेडेकर यांनी खासदार जाधव यांना प्रत्युत्तर दिलंय. आधी तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्या, उद्धवजीच काय, माझ्या सारखा शागिर्दही तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही.मागील दोन वेळा तुम्ही मोदी लाटेत निवडून आला आहात,अत्यंत अकार्यक्षम खासदार जिल्ह्याला मिळाला आहे”.असही खेडेकर म्हणाले.