‘आगामी काही दिवसात शिवसैनिकच संजय राऊतांना मजबूत चोपतील’

मुंबई – राज्यात सध्या सत्तास्थापनेवरून वेगवान घडामोडी सुरु असून राज्यपालांनी शिवसेनेला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. मात्र, शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची मदत घ्यावी लागणार आहे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यावरून सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आगामी काही दिवसातच शिवसैनिकच खासदार संजय राऊतांना मजबूत चोपतील, अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे यांनी टोला लगावला आहे. राणे आणि ठाकरे कुटुंबामधील राजकीय वैर सर्वज्ञात असून दोघेही नेहमीच एकमेकांवर टीका करत असतात.

निलेश राणे म्हणाले कि, मला काल पासून वाटतंय येणाऱ्या काही दिवसांत शिवसैनिकच संज्या राऊतला धरून मजबूत चोपेल, असा एकेरी उल्लेख करत त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, संज्या राऊत इतका गरीब आहे की मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघायला पवार साहेबांच्या घरी गेला. बाकी राहुदे त्याला अगोदर कोणी तरी टीव्ही आणि लाईट बिलचे पैसे द्या. आणि उध्दवला कॅडबरी चॉकलेट द्या बिचाऱ्याला वाईट वाटलं की त्याला खोटारडा म्हटलं. शाळेत असल्यासारखा वाटलं त्याला बघून, असा हल्लाबोल त्यांनी शिवसेनेवर केला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here