-->

उत्तर प्रदेश, नेपाळमध्येही शिवजयंतीचा डामडौल

वडूज  – छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उत्साहात साजरी करण्यात आली. त्याचबरोबर उत्तर प्रदेश व आपला शेजारी देश नेपाळमध्येही मराठी समाजबांधवांनी शिवजयंती मोठ्या डामडौलात साजरी केली.

उत्तर प्रदेश मराठी समाज संघटनेच्यावतीने राजधानी लखनऊमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा, भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह, नगरविकास मंत्री आशुतोष टंडन, महापौर संयुक्त भाटिया, कुलपती अलोककुमार रॉय, वक्ता पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, माजी कुलपती संजय देशमुख, नामदेवराव जाधव, हरिभाऊ बोरीकर, सुनीलकुमार लवटे, कोषाध्यक्ष गजानन पाटील, महामंत्री पांडुरंग राऊत, प्रदीप गायकवाड, आनंदराव देवकर, मनोहर फडतरे, अक्षय देशमुख, सूरज देवकर व मराठी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. दिनेश शर्मा व मान्यवरांनी छत्रपती शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती दिली. मराठी समाज संघटनेच्या माध्यमातून साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती, गणेशोत्सव व इतर विधायक उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. मराठी समाज बांधवांना उत्तर प्रदेशात येणाऱ्या अडचणींमध्ये मदत करण्याची ग्वाहीही मान्यवरांनी दिली. संघटनेचे संस्थापक उमेश पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष विश्वनाथ देवकर यांनी स्वागत केले. आग्रा येथेही सुरेश मोरे, मुरलीधर घाडगे, राजाराम मोरे व सहकाऱ्यांनी शिवजयंती जल्लोषात साजरी केली.

छ. शिवरायांना नेपाळमध्ये अभिवादन
आपला शेजारी देश असलेल्या नेपाळमधील दलदले या गावात छ. उदयनराजे भोसले विकास संस्था व मराठी समाजबांधवांनी शिवजयंती साजरी केली. संघटनेच्या संस्थापक स्वाती बगाडे, नेपाळ शाखाप्रमुख सौ. दीपिका शिंगाडे, उत्तर भारत संघटक विठ्ठल शिंगाडे, युवा आघाडीप्रमुख दीपिका सापकोटा, सुहास भोसले, भरत मगर, भारतीय व नेपाळी नागरिक उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.